नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वयाने कितीही मोठे झाले, तरी बालपणातील आठवणींचा कप्पा उघडला की, लहानपणीच्या काळात रमणाऱ्या बहीण-भावाच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण आज घराघरांत साजरा होत आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्याबरोबरच सीमेवर लढणाऱ्या जवानांनाही राखी बांधली जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील सोनी गावात जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की, “भाऊ आणि बहिणीमधील अपार प्रेमाचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना शुभेच्छा. हा पवित्र सण तुम्हा सर्वांच्या नात्यात नवीन गोडवा घेऊन येवो आणि आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येवो.”