मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्ययात्रेच्या कार्यक्रमात भोकरदन येथे रविवारी रात्री गोंधळ झाला.पक्षातील गटबाजीमुळे हा प्रकारघडल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करीत भाषणकरण्यास नकार दिला. मात्र,जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर जयंत पाटलांनी १० मिनिटांचे आटोपशीर भाषण केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगटाचा शिवस्वराज्य यात्रेचा कार्यक्रमशांततेत सुरू होता. खासदार अमोलकोल्हे, माजी आमदार चंद्रकांत दानवेयांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनीजोरदार प्रतिसाद दिला, तर माजीमंत्री राजेश टोपे यांचे भाषण सुरूअसताना जाफराबाद येथील काहीकार्यकर्त्यांनी भावी आमदार सुरेखालहाने असे बोर्ड झळकावले.
त्याला भोकरदनच्या कार्यकर्त्यांनी जोरदारविरोध दर्शवत तत्काळ पोस्टर खालीघ्या, असे म्हणत गोंधळ करण्याससुुरुवात केली. दोन्हीकडील कार्यकर्तेउठून उभे राहिले. नेतेमंडळींनीकार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्नकेला तरी १५ ते २० मिनिटे गदारोळसुरूच राहिला. पक्षाच्याप्रदेशाध्यक्षांसमाेर च हा प्रकारघडल्याने जयंत पाटील चांगलेचसंतापले. त्यांनी उपस्थितांनामार्गदर्शन करण्यास नकार दिला.मात्र जिल्हाध्यक्ष देशमुख यांनीसर्वांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंतपाटलांची गोंधळाबद्दल माफीमागितली. त्यानंतर जयंत पाटील यांनीभाषण केले. दरम्यान या प्रकाराचीजिल्ह्यातील राजकीय वर्तुळातचांगलीच चर्चा झाली.