मुंबई : तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण होत आहे. मात्र असे असूनही पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. मागील सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल २.५५ रुपयांनी आणि डिझेल ३.४१ रुपयांनी महागले होते. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये या स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचा भाव होता.
असा आहे दर
आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.