ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘प्रसादरुपी खुराक मानांकन चाचणी कुस्ती थाटात ; १६० कुस्तीपटूचा सहभाग

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वछस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रसादरुपी खुराक मानांकन चाचणी कुस्ती स्पर्धा-२०२४’ चे मंगळवारी फतेसिंह क्रिडांगण, इन्डोअर स्टेडियम येथे थाटात शुभारंभ संपन्न झाला. या स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळाला असून, १६० कुस्तीपटूनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत १० ते १४ वयोगटातील २५ ते ४५ किलो, १४ ते १७ आतील ४५ ते ७० किलो, १७ ते २० आतील ६० ते ९० व खुला, आणि २० ते २५ वयोगटातील ७० ते १०० किलो व खुला असे एकूण वय व वजन गटातील प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय असे यशस्वी ३ क्रमांक काढण्यात आले. यातील यशस्वी कुस्तीगीरांना खुरका दिला जाणार असून, ही तालुक्यात प्रथमच मॅटवरील कुस्ती स्पर्धा संपन्न झाले आहे. तब्बल ८ ते १० तास स्पर्धा संपन्न झाली. अमोलराजे भोसले यांच्याकडून यशस्वी कुस्तीदिरांना ट्रॅकसूट देण्यात येणार आहे. या स्पर्धेत मुलींचा सहभाग होता.

दरम्यान श्रींचे पूजन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वयस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबर, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, अॅड. संतोष खोबरे, उषाताई हंचाटे, डॉ.आर.व्ही.पाटील, मनोज निकम, डबल उपमहाराष्ट्र केसरी पै.मौलाली शेख, मारुती वडार, शाहू मगर, उपमहाराष्ट्र केसरी पै.भरत मेकाले, एन.आय.एस. कोच राष्ट्रीय पंच पै.धनराज भुजबळ, महाराष्ट चॅम्पीयन पै.तानाजी भोसले, के.एल.ई. मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक नंदाजी कदम, शरद जगदाळे, शरद जंगाले, पै.महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार, पै.सद्दाम शेरीकर, अभियंता अमित थोरात, राजेश कळमणकर, अरुण उपाध्य यांच्या हस्ते करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.

कुस्ती क्षेत्राला अच्छेदिन
कुस्तीला उभारणी व नव चालना, संजीवनी मिळण्यासाठी, नवोदित पैलवानांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मिळावी, अनेक होतकरू, कष्टकरी पैलवान समोर यावेत याकरिता गत जानेवारी पासून न्यासाकडून प्रसाद रुपी खुराक देण्यात येत आहे. सध्या कुस्तीक्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण आणि विकासात्मक प्रयत्न सर्व स्तरातून केले जात आहेत. अनेक मैदानामध्ये नवोदीत होतकरू आणि चांगल्या पैलवानांना पाठबळ मिळवून देण्यासाठी अनेक वस्ताद मंडळी झटत असतात. खऱ्या अर्थाने विविध तालमीतील उदयोन्मुख पैलवान जपत असतात. कुस्ती जगवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे ओळखून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कुस्तीगीरांना न्यासाकडून प्रसाद रुपी खुराक देण्यात येत आहे. त्यामुळे कुस्तीगीरांना अच्छे दिन आले आहेत.
-उपमहाराष्ट्र केसरी पै.भरत मेकाले, सोलापूर

देण्यात येणारे प्रसादरूपी खुराक : या ‘प्रसादरुपी खुराक मानांकन चाचणी स्पर्धेतील विजेते वजनी गटात तीन प्रथम, द्वितीय, तृतीय मानांकित पैलवानास दरमहा खालीलप्रमाणे प्रसादरुपी लाभ मिळणार आहे. त्यांना तीन किलो तूप, तीन किलो बदाम, एक किलो खारीक, थंडाई मसाला देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास अवनिष कल्याणशेट्टी, महांत बिराजदार जेऊर, पिंटू सोनटक्के, प्रकाश सोनटक्के, परमेश्वर व्हसुरे, शंभूराजे गोटे, बाबुराव पवार, दत्तात्रय बिराजदार, अमोल कोकाटे, नागराज कलबुर्गी, पिंटू साठे, कल्याणी लकशेट्टी, अविनाश राठोड, मारुतीराव मुळे, सौरभ मोरे, फहीम पिरजादे, श्री गिरव, प्रसाद मोरे, ऋषी लोणारी, महिबूब धडम, भरत पाटील, दिनेश हळगोदे, विश्वनाथ मुटगी, निखील पाटील, गोटू माने, प्रवीण घाडगे, मैनुद्दीन कोरबू, बाळासाहेब पोळ, शिवराज स्वामी, पुरोहित संजय कुलकर्णी, राजेंद्र पवार, सत्तारभाई शेख, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, आकशा सुरवसे, शुभम कामनुरकर, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, सुमित कल्याणी, स्वामींनात बाबर, शेखर चौगुले, विठ्ठल रेडी, गोविंदराव शिंदे, राहुल इंडे, काशिनाथ कदम, आकाश गडकरी, बसवराज वाडे, आकाश वाघमारे, ज्ञानेश्वर भोसले, यांच्यासह तालुक्यातील कुस्तीगीर, कुस्ती प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वेळ अधिकारी म्हणून माधव लाड व पंच म्हणून लक्ष्मीकांत बिराजदार, रियाज नदाफ, महेश कोळी, शिवाजी परळकर यांनी तर कुस्तीचे सुत्रसंचलन अशोक बनसोडे मंद्रुप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अरविंद शिंदे, सूत्रसंचालन क्रीडा भारतीचे अभिजित लोके तर आभार गोटू माने यांनी माणले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!