ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांची बाजू घेतल्याने आमदाराने केली तरुणाला मारहाण !

मुंबई :  वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला मनोज जरांगे यांची बाजू घेतल्याने मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र जरांगे पाटील आपल्यावर खोटे आरोप लावत असल्याचे मत राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात वाद सुरू आहेत. अशातच राजेंद्र राऊत यांच्यावर हे आरोप होताना दिसत आहेत.
आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांनी केलेले आरोप फेटाळले असून मारहाण झालेल्या तरुणाने अजून तक्रारही दाखल केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, जरांगे दादांच्या डोळ्यावर काळी पट्टी आली आहे. बार्शीत सभा झाली तेव्हापासून जरांगे यांनी मला टार्गेट केले आहे. ते म्हणतात आम्ही सुपारी घेतली, बीड जाळायची आहे का? आम्हाला गोळ्या घालणार आहात का? एवढी दादागिरी गुंडगिरी कशी चालणार लोकशाहीत? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक होत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद चिघळत असून राऊत यांच्याविरोधात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर सोलापूरमध्ये मराठा समाज एकत्रित येत आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आहे. तसेच आमदार राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिली तर आम्ही गनिमी काव्याने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी मराठा समाजाने दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी घोंगडी बैठक देखील घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!