पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यात शरद पवार गटाचे नेते खा.अमोल कोल्हे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वाक्ययुद्ध सुरु आहे. पवारांनी वक्तव्य केल्यावर खा.कोल्हे त्यांच्यावर टीका करीत आहे. आता पुन्हा एकदा खा.अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.
खा.कोल्हे म्हणाले कि, महाराष्ट्रात केवळ दोनच साहेब आहेत. एक शरद पवार पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. आमची पिढी या दोघांनाच साहेब मानते. त्यामुळे एखाद्या पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कुणी साहेब होत नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी यावेळी केली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात दोनच साहेब आहेत. एक शरद पवार आणि दुसरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आमची पीढी या दोघांनाच साहेब म्हणते. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, सामाजिक व्यासंग असेल, दुसऱ्याच्या नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहणे असेल किंवा संकट आल्यानंतर पळून न जाता संकटाला छातीवर झेलणे म्हणजे पवारसाहेब असणे आहे. हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने अजितदादांना सांगण्याची गरज नाही.