ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साने गुरुजींचे विचार काळाची गरज

अक्कलकोट शाखेच्यावतीने पुरस्कार वितरण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

आदर्श पुरस्कार मिळवलेल्या शिक्षकांनी पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षणाची दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच साने गुरुजींचे विचार आचरणात आणावे आणि देशाच्या भविष्यासाठी आदर्श पिढी घडवावी,असे प्रतिपादन अक्कलकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी केले.

मंगरूळे प्रशाला अक्कलकोट येथे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला तालुका शाखा अक्कलकोटच्यावतीने तालुकास्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यावेळी अरबाळे बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई कथामालेचे प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी, अशोक म्हमाणे ,अशोक खानापुरे, तालुकाध्यक्ष परमेश्वर व्हसुरे ,मल्लिनाथ पाटील रमेश येणेगुरे ,सुरेश पिरगोंडे,पत्रकार मारुती बावडे आदी उपस्थित होते.तालुक्यातून अकरा शिक्षकांना शाल सन्मानचिन्ह प्रमाणपत्र गुच्छ व श्यामची आई पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्पा साखरे,फारुख शेख,जगदेव प्रचंडे, श्रीशैल म्हमाणे,विठ्ठल हेगडे,वाहिद पटेल खादीरबाशा शेख,सचिन गडसिंग राजशेखर विजापुरे यांनी परिश्रम घेतले.

….यांचा झाला गौरव

शिवानंद बिराजदार,प्रा.मलकप्पा भरमशेट्टी,अरविंद शिंदे,कस्तुरचंद आळंद,ज्ञानेश्वर कदम,विनायक राठोड,भाग्यकांत कल्याणी,कासिम मासुलदर,वर्षाराणी हाताळी,ललिता लवटे व शुभांगी गडसिंग

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!