ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…म्हणून लोकसभेत 400 पार करता आले नाही ; मंत्री गडकरी !

नागपूर : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘अब की बार चारसो पार’चा नारा दिला होता. मात्र, त्यांच्या या घोषणेला अपक्षेत असं यश मिळालं नाही. कारण निवडणुच्या निकालात भाजपच्या वाट्याला 240 जागा आल्या. त्यामुळे 400 पार करणं लांबंच पण आधीच्या निवडणुकीत मिळालेल्या 303 जागांवरून पक्ष थेट 240 जागांवर आला. तर पक्षाच्या या अपयशाचं कारण आता भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “विरोधकांनी जनतेची दिशाभूल करणारा प्रचार केला आणि त्या प्रचाराला लोक फसले. विरोधकांच्या याच प्रचार मोहिमेमुळे जनतेची दिशाभूल झाली.” तसंच, पूर्ण बहुमत मिळाल्यास भाजप संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप विरोधकांनी केला, याचा मागासवर्गीय समाजावर परिणाम झाला. शिवाय आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी जे चांगली काम करण्याचा प्रयत्न करत आहे, ती कामंही शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगितलं गेलं, या सर्वाचा फटका निवडणुकीत बसल्याचं गडकरी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!