मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज सर्वात लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप देत असतांना भावूक होवून अनेक गणेशभक्त निरोप देत आहे. तर नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बाप्पाला साकडे घालत निरोप दिला आहे. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर त्यांच्या सागर या बंगल्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम हैदात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने देखील विविध ठिकाणी मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या सागर या बंगल्यावरील विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला निरोप दिला. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्यांनी सर्वांचे विघ्न दूर करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांनी आम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी, अशा टीकाही त्यांनी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात भाजपच्या वतीने देखील जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील नेत्यांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार देखील होते. भाजप सोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर पक्षाचे नेते देखील फडणवीस यांच्या घरी दाखल झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात फडणवीस यांचा सागर बंगला राजकारणाचे मुख्य केंद्रबिंदू राहणार आहे.