मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या १० दिवस मोठ्या उत्साहात पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. यासाठी मुंबई-पुण्यासह राज्यभरात प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडवा यासाठी पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
मुंबईमधील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीचे विसर्जन 8:50 वाजता झाले. विसर्जन मिरवणुकीत घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला होता.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. राज्यात विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडवर विसर्जन मार्गासाठी निघाला. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकातून पुढे निघाली आहे.
गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी नगरपरिषेकडून पाच ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करुन मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती याला ओझर मधील नागरिकांनी उस्पुर्त प्रतिसाद सायंकाळी चार वाजेपर्यंत २७८ मूर्ती संकलन झाल्या होत्या. पाचही ठिकाणी मूर्ती संकलनासाठी गर्दी दिसून आली. या केंद्रांवर नगर परिषदेच्या कर्मचारी आणि गणेशमूर्ती संकलनासाठीची वाहने सज्ज होती. या संकलित केलेल्या मूर्ती एका कृत्रिम तलावावर विसर्जित करण्यात आल्या. भक्तांनी शक्यतो मूर्ति संकलन करून कृत्रिम तलावामध्ये गणरायाचे विसर्जन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्याकडून करण्यात आले होते.
दहा दिवसानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातील मानाचे 5 ही गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग मंडळ, केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहे.