ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री भुजबळ यांची मागणी : विधानसभेला ‘इतक्या’ जागा हव्या !

नाशिक : वृत्तसंस्था

आगामी महिनाभरात विधानसभेची आचारसंहिता लागू होवू शकते. या निवडणुकीत महायुती असो की, महाविकास आघाडी अद्याप कोणीच जागावाटपाबाबत ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. असे असले, तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला किमान 80 जागा मिळाव्यात अशी मागणी राहणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ पत्रकारांशी बोलताना दिली.

भुजबळ म्हणाले, नाशिकमध्ये विद्यमान आमदार असलेल्या सहा जागांची मागणी आम्ही करणार आहोत. सोबतच मालेगावची जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. सध्या आमच्यासोबत ६० आमदार आहेत, इतर पक्षांतून आलेल्या आमदारांसाठी आम्हाला १० ते २० जागा जास्त लागणार असल्याने एकूण ८० जागांची मागणी करणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

आगामी निवडणुकीत महायुतीची मते वाढली पाहिजेत, त्यासाठी सगळ्यांनीच विचार करून राजकीय वक्तव्ये करावीत, याचा मतांवर परिणाम तर होणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी. मात्र, सध्याच्या वातावरणात राजकीय नेते करत असलेल्या वक्तव्यांमुळे पक्षावर परिणाम होताना दिसत असल्याचे सांगत भाजप आमदार नीतेश राणे यांच्या वक्तव्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. येवल्यातील शिवसृष्टीचे काम आटोक्यात आले आहे. येत्या काही दिवसांत पुतळ्याचे अनावरण करावयाचे असून, त्यासाठी तयारी व नियोजन सुरू आहे. उद्घाटनानंतरही काही उरलेले बुरूज, प्रवेशद्वारे आदी किरकोळ कामे सुरू राहतील. मुंबई नाका येथील सर्कलवर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचेही अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तारखा जुळून येत नसल्याचे सांगत येत्या शनिवारी (दि. २८) अनावरण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!