ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान : तर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येणार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आज सर्वत्र धनगर समाजाचे आंदोलन सुरु झाले असून या आंदोलन दरम्यान भाजपचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कि, धनगर समाजाने शेळ्यामेंढ्या राखणे बंद केले तर महाराष्ट्रातील लोकांवर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीतून (एसटी) आरक्षणाची मागणी केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात या समाजाने सोममवारी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बोलताना पडळकर यांनी उपरोक्त विधान केले. पडळकर म्हणाले, धनगर समाज 8-10 महिने शेळ्या-मेंढ्या घेऊन घराबाहेर राहतो. महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या दर्जाचे मांस मिळावे म्हणून दिवसाला 35 किलोमीटरची पायपीट करतो. पण एखाद्याच्या रानात चुकून मेंढरे गेली तर मेंढपाळाला गुराढोरासारखे मारले जाते. पोलिसही त्याची दखल घेत नाही. हा अन्याय आम्ही का सहन करायचा? धनगरांनी शेळ्या-मेंढ्या पाळणे बंद करेले तर महाराष्ट्रातील जनतेवर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येईल.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे ही आमची पहिली मागणी आहे. आमची मुले शिकली तर त्यांच्यावर मेंढरे पाळायची वेळ येणार नाही. धनगर नेहमीच सरकारच्या बाजूने उभा राहिला. पण आम्हाला अद्याप काहीच मिळाले नाही. त्यामुळे सरकारने धनगर समाजाला तत्काळ एसटी आरक्षण देण्याचा जीआर काढावा. धनगर समाजाकडे कोणतेही कारखाने नाहीत. त्यामुळे आम्ही आरक्षणाची मागणी करत आहोत. एक-दोन नेत्यांच्या सुतगिरण्या सोडल्या तर आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा, असे आव्हानही पडळकर यांनी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विचारला.

उल्लेखनीय बाब म्हणजे धनगर समाजाकडून आज आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. नेवासा तालुक्यातील धनगर आंदोलकांनी नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यात शेकडो समाजबांधवांनी सहभाग घेतला. यावेळी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!