सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षापासून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा उपोषण सुरु केले असून आता सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन 26 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक दिली आहे.
पवार यांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने दि. 26 सप्टेंबर गुरुवार रोजी सकल मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करावा तसेच सगेसोयरे सह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 8 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा व ओ.बी.सी. यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडवण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरु करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सत्ताधारी मराठा आणि OBC यांच्यात भांडणे व्हावीत म्हणून हाके आणि इतर लोकांना अंतरावली सराटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर उपोषणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठा व OBC यांच्या मध्ये विनाकारण वाद होत आहे.