ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात डाळ कंपनीच्या मालकाची लाखो रुपयात फसवणूक !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी व फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. ३० टन हरभरा भरून गाडी पाठवून देतो, असे सांगत हरभरा डाळ तयार करणाऱ्या कंपनीच्या मालकाकडून १८ लाख ११ हजार घेऊन ठरल्याप्रमाणे हरभरा गाडी न पाठविता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी एकावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.26) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी एमआयडीसीत राजहरी फुड्स नावाची विजयकुमार हरीकिशन गिल्डा यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये कच्चा हरभरा घेतला जातो व त्याची हरभरा डाळ तयार केली जाते. मंगळवारी (दि.26) सागर चौधरी याने विजयकुमार गिल्डा यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून हरभरा पाहिजे का? अशी विचारणा केली. त्यावर हरभरा कोठे आहे व तो कसा आहे पाहिल्यानंतर व्यवहार ठरवू असे विजयकुमार गिल्डा यांनी सागर चौधरीला सांगितले. त्यानंतर वाशिम हिंगोली येथे हरभरा घेण्यासाठी माणूस पाठवला. तसेच ३० टन हरभऱ्याची किंमत ६३ रुपये प्रति किलो प्रमाणे ठरवून १८ लाख ११ हजार ३८५ रुपये फिर्यादीने सागर चौधरी नावाच्या व्यक्तीस त्याच्या खात्यावर पैसेही पाठवले.

सागर चौधरी याने ठरल्याप्रमाणे गिल्डा यांना हरभरा गाडी पाठवतो असे सांगितले. व्यवहारात ठरल्याप्रमाणे रक्कम पाठवूनही हरभरा न देता सागर चौधरीने पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद मोहोळ पोलीस ठाण्यात विजयकुमार गिल्डा यांनी दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी सागर चौधरी च्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!