ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या गुरुवार १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे.

सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि शुभमन गिल यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. सलामीसाठी मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. फॉर्मात असणाऱ्या गिल याला वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सराव सामन्यात धमाकेदार शतक करणाऱ्या ऋषभ पंतला संघात स्थान मिळवता आले नाही. त्याच्या ऐवजी विराटने अनुभवी वृद्धीमान साहाची निवड केली आहे.


पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. तर हनुमा विहारीच्या रुपानं एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे. बुमराह, शामी आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. तर अनुभवी अश्विनच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ –
मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, शामी, जसप्रीत बुमराह

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!