---Advertisement---

माजी आमदार राजीव आवळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

On: December 16, 2020 3:29 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला.

आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा उतराई होण्यासाठी राष्ट्रवादीशिवाय दुसरं काम करणार नाही असे स्पष्ट करतानाच २०२१ मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन माजी आमदार राजीव आवळे यांनी प्रवेश करताना दिले.येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विचार पोचविण्यात कमी पडणार नाही. राष्ट्रवादीशिवाय आपल्याला यापुढे पर्याय राहणार नाही असेही राजीव आवळे यांनी स्पष्ट केले.

यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नेते रामभाऊ सुर्यवंशी, कबनूरचे भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, भाजपाचे नितिन कामत, बाबू पतोरी, दिनेश डायमा, पिंपरी-चिंचवड येथील लहुजी सेनेचे युवराज दाखले, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांनी प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, कोल्हापूरचे जिल्हाअध्यक्ष ए. वाय पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ पिष्ठे, मदन कारंडे, बी. के. चव्हाण, प्रकाश पाटील उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पायाला भिंगरी बांधल्यासारखे पवारसाहेब आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही, राजकीय जीवनात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करतोय. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचं काम मी पहात आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत असं अजित पवार यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!