ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्रीय मंत्री राणेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट ; राजकीय चर्चेला उधान !

मुंबई : वृत्तसंस्था

विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या अनुषंगाने महायुती आणि महाविकासआघाडीच्या विविध बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे.

महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. येत्या निवडणुकीत काहीही करुन आपलं महायुतीचं सरकार यावं, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्र दौरे करत आहेत. कालपासून दोन दिवस अमित शाह हे मुंबईत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या मेळाव्याला नारायण राणेंनीही हजेरी लावली होती. यानंतर आता नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली.

तसेच महायुतीचा फॉर्म्युला कसा असणार, याबद्दलही त्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी नारायण राणेंनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारांबद्दलही चर्चा केली. कुडाळ मालवण विधानसभा मतदार भाजपला द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंकडे केली. सध्या या मतदारसंघात ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!