सोलापूर ; प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प टेंभुर्णी अंतर्गत पोषण माह 2024 चा समारोप कार्यक्रम टेंभुर्णी येथे पार पडला .सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी साहेब तसेच जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम आधिकारी मा.श्री प्रसाद मिरकले साहेब , सोलापूर जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी , टेंभुर्णी प्रकल्पातील मुख्य सेविका श्रीमती जयश्री पवार मॅडम, श्रीमती लता पाटील मॅडम, श्रीमती अर्चना खटके मॅडम व श्रीमती आशा मगर मॅडम ,शुभदा बचत गट अध्यक्ष श्रीमती स्वाती पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री बालाजी अल्लडवाड यांनी केले .त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये पोषण माह चे महत्व आणि पोषण माहमध्ये जिल्ह्यामध्ये झालेल्या कामांचा आढावा सविस्तर वर्णन केला. तसेच जिल्हा कार्यक्रम आधिकारी श्री प्रसाद मिरकले सर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पोषण माह मध्ये उत्कृष्ट कार्य केले याबाबत विवेचन केले. सोलापूर जिल्ह्याने केलेल्या उत्कृष्ट कामाचे वर्णन केले व यापुढेही सोलापूर जिल्हा अंगणवाडीच्या सर्व सेवा समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसर राहील याबाबत सर्व उपस्थित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कुलदीप जंगम साहेब यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका पालक व उपस्थीत जनसंमुदायास मार्गदर्शन करताना आपण अंगणवाडीच्या सेवा तसेच जिल्हा परिषदेच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर कटीबद्ध आहे, असे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगारी मुक्त गाव ही संकल्पना प्रत्येक गावामध्ये राबवावी याबाबत मार्गदर्शन केले .सायबर क्राईम कसा थांबवावा व सायबर क्राईम पासून स्वतःला कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन केले. खास करून उपस्थित महिलांना आर्थिक व्यवहार करताना आर्थिक साक्षरता व आर्थिक फसवणूक यापासून स्वतःला कसं वाचवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत माहिती देताना अत्याचाराचे प्रकार व अत्याचार झाल्यास मदत कशी मागावी याबाबत संरक्षण अधिकारी श्रीमती उज्वला कापसे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. महिला व बाल विकास विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पोषण माह च्या अनुषंगाने पोषण भी आणि पढाई भी या विषयाबाबत मार्गदर्शन श्री नितीन थोरात, जिल्हा समन्वयक , ई आकार यांनी केले. श्रीअवधूत देशमुख यांनी महिला बचत गटाच्या उन्नती बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये पोषण अभियान 2024 मध्ये उत्कृष्ठ कार्य केले असल्यामळे जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन टेंभुर्णी प्रकल्पाचे विस्तार अधिकारी श्री आकाश कोकाटे यांनी केले.