ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना लागणारी वीज ही सोलरद्वारे देणार !

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची घोषणा

सोलापूर : वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून दुसरीकडे महायुती सरकारचे मंत्री राज्यातील अनेक भागात ‘लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमांना उपस्थिती देत असून नुकतेच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद्र राऊत, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, आ. समाधान आवताडे, माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शहाजी पवार, चेतनसिंह केदार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, हे सरकार शेतकर्‍यांचा विचार करणारे आहे. राज्यातील शेतकर्‍यांची शेतीची वीज बिले माफ करण्यात आली आहेत. आता दिवसा बारा तास अखंडित वीज सेवा आपणाला कायमस्वरूपी मिळेल असे प्रतीपादन त्यांनी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या शेतीच्या विजेचा प्रश्न गंभीर होता. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर तो सोडवण्यात यश आले आहे. आगामी 15 महिन्यांनंतर शेतकर्‍यांना दिवसा बारा तास दिवसा वीज उपलब्ध करून देत आहोत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना लागणारी वीज ही सोलरद्वारे दिली जाईल. जेणेकरून शेतकर्‍यांना व सरकारला याचा भार पडणार नाही. असे म्हणून फडणवीस म्हणाले की, सौर कृषी पंप शेतकर्‍यांना दहा टक्के रक्कम भरून सरकार 90 टक्के रक्कम भरून उपलब्ध करून देणार आहे. एक रुपयात पिक विम्याची संकल्पना या सरकारने यांनी ज्यातून आठ हजार कोटींचा फायदा शेतकर्‍यांना झाला आहे. जलसंधारणाची कार्य आमच्या कार्यकाळात झाली सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ हटवण्यासाठी निधी मिळवून दिला. अनेक बंद पडलेल्या योजना सुरू केल्या. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचा विचार करण्यात आला. यावेळी आ समाधान अवताडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन भारत मुढे यानी केले. महिलांसाठी लेक लाडकी सारखी योजना, एसटीच्या माध्यमातून अर्ध्या तिकिटात प्रवास सोयीचा झाला. महिन्याला लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपयांची ओवाळणी सरकारने दिली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याची अ‍ॅडव्हान्स मध्येच रक्कम जमा केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!