ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…म्हणून झाला मुख्यमंत्री शिंदेंचा सोलापुर दौरा पाचव्यांदा रद्द !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले असून त्यातील लाडकी बहिण योजना गेल्या काही महिन्यापासून राज्यात जोरदार सुरु आहे. या लाडकी बहिण कार्यक्रम राज्यातील अनेक शहरात मुख्यमंत्री यांचे जाहीर कार्यक्रम अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत असून मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे.

मात्र आज मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. सोलापूर दौरा आणि राज्यमंत्री मंडळाची बैठकही रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूर शहरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी येणार होते. हा कार्यक्रम आज साडेबारा वाजता होणार असून त्याची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा आतापर्यंत पाचव्यांदा रद्द झाला आहे. कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली असून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!