ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकमंगल’कडून कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

 

सोलापूर ,दि.२४ : सोलापूर शहरातील सुमारे 50 सुवर्णकारांना लोकमंगल पंतसंस्थेच्या माध्यमातून व्यवसायासाठी मदतीचा हात देण्यात आला. प्रत्येकाला एक लाख प्रमाणे 50 लाखांचे अर्थसहाय्य कारागिरांना देण्यात आले. त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले.

 

सर्व कारागिरांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे आपली अडचण मांडली होती. त्यावेळी आ. देशमुख यांनी तातडीने अर्थसहाय्य देत त्यांची समस्या सोडवली.कोरोनामुळे सराफ दुकाने बंद झाली होती. त्यामुळे कुटुंबियांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यावेळी श्याम पोतदार यांनी कारागिरांची कालिका प्रतिष्ठान संस्था स्थापन करत आ. सुभाष देशमुख यांची भेट घेतली. आ. देशमुख यांनी कारागिरांच्या समस्या जाणून घेत त्यांना तातडीने अर्थसहाय्य करण्याच्या सूचना दिल्या. पंतसंस्थचे चेअरमन गुरण्णा तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील आणि व्यवस्थापिका अलका देवडकर यांनी सर्व औपचारिता पूर्ण करून आठवड्याच्या आता प्रत्येकी एक लाख याप्रमाणे 50 कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य केले.

 

स्वतःचा व्यवसाय सुरू कराः आ. देशमुख

केवळ कारागीर म्हणून काम न करता स्वत:चा सराफी व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हा, असा सल्ला आ. सुभाष देशमुख यांनी कारागिरांना दिला. 50 कारागिरातला जो कोणी सराफी व्यवसाय करण्यास उत्सुक असेल त्याला 20 लाख रुपयांपर्यंत मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!