ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संघातर्फे विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात शस्त्रपूजन

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील नागपूर शहरात आज  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात शस्त्रपूजन केले. त्यापूर्वी स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. नागपूरमधील संघ मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन आणि के. राधाकृष्णन यांचीही उपस्थिती होती.

आपल्या भाषणात मोहन भागवत म्हणाले की, आमच्या संकल्पाची परीक्षा घेण्याचे षड्यंत्र आणि भारताला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे. बांगलादेशात भारत हा आपल्यासाठी धोका असल्याचे हे खोटे पसरवले जात आहे, त्यांची दिशाभूल कोण करत आहे हे सर्वांना माहीत आहे. भारतातही अशी परिस्थिती निर्माण व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

विजयादशमी उत्सवादरम्यान भागवत यांनी कोलकात्यातील डॉक्टरावर झालेल्या बलात्कार तसेच हत्या, इस्रायल-हमास युद्ध, धार्मिक मिरवणुकांवर होणारी दगडफेक आणि जगात भारताची वाढती प्रतिष्ठा यावरही भाष्य केले. विजयादशमी हा सण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 1925 मध्ये विजयादशीच्या दिवशी डॉ. बलराम कृष्ण हेडगेवार यांनी संघाची सुरुवात केली होती. 2024 पासून संघ आपल्या स्थापना दिनाची शताब्दी पूर्ण करत आहे. त्यामुळे वर्षभरात होणाऱ्या संघाच्या प्रमुख कार्यक्रमांची माहितीही आज देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!