ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा ?

 

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. मात्र अजूनही महायुतीत काही जागांचा तिढा असून तो सुटल्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला स्पष्ट होईल. दरम्यान महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे..

महायुतीच्या नेत्यांसोबत मुंबईत एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाली. शनिवारी रात्री झालेल्या या चर्चेत काही मतदारसंघाबाबत खलबतं झाली. दोन तास झालेल्या या चर्चेत शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबत चर्चा झाली आहे. आता महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!