ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपच्या माजी मंत्र्याची मुलगी शिंदेंच्या सेनेत जाणार..

google.com, pub-1602819151212103, DIRECT, f08c47fec0942fa0

 

मुंबई वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पक्ष बदलण्याचा धडाका सुरूय. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याही पत्नी आहेत. मात्र सध्या त्या विभक्त राहात आहेत. त्या त्यांचे पती ज्या मतदार संघातून आमदार होते त्या कन्नड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. हा मतदार संघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे दानवे यांच्या कन्या संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

कन्नड विधानसभा मतदार संघ हा एकेकाळी हर्षवर्धन जाधव यांचा बालेकिल्ला होता. ते या मतदार संघातून निवडून ही आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला होता. त्यांच्या पत्नी संजना जाधव यांचीही राजकीय महत्वकांक्षा लपून राहीलेल्या नाही. मात्र हर्षवर्धन जाधव आणि त्याच्यात वाद होते. त्यामुळे ते दोघेही विभक्त राहात आहेत. संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे.

त्यांनाही कन्नड विधानसभेची निवडणूक लढवायची होती. मात्र त्यांना ती लढता आली नव्हती. आता त्यांना निवडणूक लढण्याची संधी आहे. त्यामुळे त्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारीचीही घोषणा करण्यात येणार आहे. त्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात असतील. आज दुपारी त्यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित समजला जात आहे. या मतदार संघातून ठाकरे यांच्या शिवसेने उमेदवार जाहीर केला आहे. संजना या मैदानात असल्यास इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना रंगणार आहे.

हा मतदार संघ जाधव कुटुंबाचा गड राहीला आहे. त्यामुळे त्या कुटुंबातील आणखी कोणी विधानसभेच्या रिंगणात उतरणार का? या बाबत उत्सुकता आहे. हर्षवर्धन जाधव यांनी आपण निवडणूक रिंगणात उतरणार नाही. पण जाधव कुटुंबातील व्यक्ती निवडणूक रिंगणात असेल असे या आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे तो उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे झाल्यास कन्नड विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!