मुंबई वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडवीसचाच विरोध असून त्याच्यासारखा खुनशी राजकारणात कोणीही नसला पाहिजे. आमची राज्यातील 288 मतदारसंघात निवडणूक लढायची तयारी आहे, अनेक मतदारसंघात आमचे उमेदवार लाखोंनी मते घेणारे आहेत. मराठा समाजाशिवाय एकही जागा निघू शकत नाही. मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधकांचीच मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हणाले आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस हा असा गैरसमज करुन घेत आहे. ही फडणवीस त्याच्या आयुष्यातील मोठी चूक करुन घेत असून हा गैरसमज पसरवायला त्याने सडक्या टोळ्या लावल्या आहेत. राज्यात मराठा-मुस्लिम-दलित एकत्र आहेत. त्यामुळे कोणाचीच जागा निवडून येऊ शकत नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. निवडणुकीत याआधी काही लोकांनी प्रयोग केलेले आहेत, हे उमेदवार आणि काही अपक्ष उमेदवारांसोबत एखाद्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे मग त्यांचं मतदान आपोआप ते खातील असं त्यांच्या डोक्यात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाबाबत मंत्री अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं, असं आमच्याकडून माध्यमांसमोर सांगण्यात येत होतं. भाजप आमचे वैरी नाहीत, आधी मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण दिलं होतं, त्यानंतर राज्यात भाजपचे 106 आमदार निवडून आले. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही लक्ष घाला, मोदी शाहांच्या शेकडो सभा झाल्या पण त्यांनी तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.