ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“माझा आरक्षणामध्ये जीव..”, जरांगेंचा फायनल निर्णय जाहीर

जालना वृत्तसंस्था 

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकी आधी आपला जाहीर निर्णय दिला आहे. “तुमच्या हिताचा निर्णय घ्या, ज्याला पाडायचं त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा”.  मराठा समाजात आता संभ्रम नसावा, आपण कुणाच्या पाठीशी आहे, त्यांचा बॉड करुन घ्या, त्याचा व्हिडिओ करा, तो व्हिडिओ व्हायरल करा, असे जरांगे म्हणाले. तुमच्या मदतीला कोण धावून येतो, ते पाहा, आणि मतदान कुणाला करायचं ते ठरवा,  असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुणाच्याही प्रचाराला जाऊ नका, आपल्या मतांशी सहमत असलेल्यांना मत द्या, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडू नका.”मराठ्यांची पोरं अडचणीत आहेत, आरक्षण मिळाले नसल्याने अन् शेती मालाला भाव नसल्यामुळे अडचणीत आहेत. त्यासाठी हे आंदोलन,संघर्ष सुरुच राहणार आहे. माझा आरक्षणामध्ये जीव आहे. आरक्षणापासून मी भूमिका बदलत नाही. मला मराठा समाज शंभर टक्के आरक्षण देऊन मोकळा करायचा आहे. निवडणुकीत मोठा होण्यासाठी रडरड करणारे खूप आहेत, त्यांनी ही रडरड समाजाच्या आरक्षणासाठी करावी,असे खडेबोल जरांगे यांनी सुनावले.

“निवडणुकीमध्ये मराठा समाज सक्रीय आहे. मराठ्यांना कुणाला मतदान करायचे ते बरोबर कळते. त्यांच्यात संभ्रम नाही. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करतील, आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहेत आणि सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, आमचे आंदोलन सुरू करणार आहे,” असे मनोज जरांगे सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!