सोलापूर, वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. प्रचाराच्या निमित्ताने खा. प्रणिती शिंदे या निंबोणी, चिक्कलगी, शिरनांदगी मारोळी, ममदाबाद हु.,लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, भोसे, रड्डे गावाचा दौरा करीत असताना त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
गाजर दाखवून मतदारांची फसवणूक करण्याची भाजप सरकारचे काम आहे, चिमुकलीवर अत्याचार झाला, बालकाचे शोषण केले या घटनेवर न बोलता, लाडकी बहिण योजनेचे आमिष महिलांना दाखवून मते घेण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आणि विकली जाणार नसल्यामुळे त्यांचे डावपेच लोकसभेप्रमाणे विधानसभेत यशस्वी होणार नाही. काम करणे ही काँग्रेसची संस्कृती आहे मला कारखाना अथवा कामाचे टेंडर घ्यावयाचे नसल्यामुळे मी आणि भगीरथ भालके 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भगीरथ भालके यांना संधी देण्याची आवाहन करत पैसे देऊन अभिमान व स्वाभिमान मिळत नाही. महाराष्ट्राची सांस्कृती चांगली आहे. असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत भगीरथ भालके दामाजीचे उपाध्यक्ष तानाजी खरात, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, दामाजीचे संचालक बसवराज पाटील, भारत बेदरे, सुरेश कोळेकर, पांडूरंग चौगुले, मुरलीधर दत्तु, ॲड. रविकिरण कोळेकर,अर्जुन पाटील,मारुती वाकडे, ॲड. राहुल घुले, नितिन पाटील, गुलाब थोरबोले, सैपन शेख, समाधान फाटे, सुनिल लोखंडे, राजू गाडवे, महावीर बंडगर, दौलत माने, सत्तार इनामदार, अशोक माने, अर्जुन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, ही निवडणूक माझ्यापेक्षा जनतेसाठी महत्त्वाची आहे निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना अमिष दाखवले जात आहेत.त्याच अमिषाला बळी पडून समविचारतील एक जण गेला परंतु 999 जण माझ्या पाठीशी असल्यामुळे येणारी निवडणूक जनतेनीच हातात घेतल्यामुळे या भागातील शेतीचे पाणी, पीक विमा, दुष्काळ या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जनताच बाजूला सरणार आहे.