ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोणालाच पाठींबा देणार नाही – मनोज जरांगे

जालना वृत्तसंस्था 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी या निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता पाडून टाका असेच आदेश दिले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडायचे आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीत मी मराठ्यांना हेच सांगितले आहे की, ज्यांना पडायचे त्याला पाडा, ज्यांना निवडून आणायचे त्यांना निवडून आणा. मी माझ्या वाक्यावर पहिल्यापासून ठाम आहे, आजही कायम राहणार आहे, आणि उद्याही राहणार आहे. राज्यभरातील मराठा समाज माझ्या ऐकण्यात आहे. मी जर म्हणालो यालाच मतदान करा, तर त्याचा अर्थ मी जात विकली असा होतो किंवा दावणीला बांधली असा होतो. पण मी माझ्या समाजाला कुणाच्याही दावणीला कसा बांधेल? असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

कोणालाच पाठींबा देणार नाही असं यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे महाराष्ट्रातील कोणत्या उमेदवारांना पाठींबा देतात याकडे समाजाचे लक्ष लागले होते पण त्यांनी कोणालाही पाठींबा दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!