काँग्रेस पक्षाने काय केले नाही ते भाजपने सांगावे
काँग्रेसच्या प्रचारार्थ सिद्धाराम म्हेत्रे यांची जाहीर सभा
अक्कलकोट, वृत्तसंस्था
भाजपाचे नुसते खोटे बोलुन कार्यक्रम चालु आहे. काँग्रेस पक्षाने काय केले असे ते म्हणतात. काँग्रेस पक्षाने काय केले नाही ते यांनी सांगावे. अधिकारी, प्रशासनावर दबाव सुरू आहे. हे चाळीस टक्केचे सरकार आहे. कर्नाटकच्या सुज्ञ जनतेने ते हटविले. आता तुम्हीही हटवुन महाविकास आघाडीला सत्तेवर आणा, असे आवाहन उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
येत्या २० तारखेला माझ्या अनुक्रमांक ४ समोरील काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजा ह्या चिन्हासमोरील बटन दाबून मला विक्रमी मतांनी विजयी करा, असेही ते म्हणाले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तांदुळवाडी, पिंजरवाडी, हणमगांव, तोगराळी, रामपुर, कर्दिहळ्ळी, कुंभारी, बोरामणी यासह मतदारसंघातीर गावांना भेट दिली. त्याप्रसांगी गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी युवा नेते रमेश पाटील, सिद्धार्थ गायकवाड, आनंद बुक्वानुरे, बंदेनवाज कोरबु, मल्लिकार्जुन पाटील, धनेश अचलारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी खोट्या आश्वासनांद्वारे जनतेची दिशाभूल करून विश्वासघात केला आहे. विकासाच्या नावाने आशा दाखवून प्रत्यक्षात काहीच ठोस कार्य झालेले नाही आणि या चुकीच्या धोरणांचा फटका सर्व सामान्य जनतेला बसला आहे. जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवून फसविणाऱ्या निष्क्रिय व भ्रष्ट भाजप व महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचा.आपल्या राज्याचे हक्काचे उद्योग भाजप महायुतीच्या महाराष्ट्रद्रोही धोरणामुळे गुजरातला गेले. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, मात्र तेलाचे दर दुप्पटच्या वर गेले आहे. आपल्या शेतमालाची निर्यात बंदी करून बाहेर देशातून आयात करून बळीराजाला रसातळाला नेण्याचे काम हे लोक करत आहे. बेरोजगारी, महागाई सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. फसव्या घोषणा महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा. महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जनहिताची जपणूक करणारे सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा द्या, असे आवाहन म्हेत्रे यांनी केले. या सभांना काँग्रेस व महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही
कारखानदारीच्या बाबतीत भाजपचे धोरण अतिशय चुकीचे आहे. कारखानदारांना त्रास देऊन काही उपयोग नाही. दुजाभाव करून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही. माझ्या निवडणुकीतून उत्तर देऊ.
रमेश पाटील, युवा नेते