कुरनूर, वृत्तसंस्था
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री गणेश विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य श्री शैल गुरव उपस्थित होते. यावेळेस प्रशालेमध्ये नव्याने रुजू झालेले विजय लवटे यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले श्री गणेश विद्यालय मध्ये देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले देशाला योगदान आणि लहान मुलाबद्दल त्यांना असलेली आवड आणि डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात आणि पंतप्रधान काळात त्यांनी दिलेले योगदान बद्दल सांस्कृतिक विभागातील कदम सर यांनी मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली.
वास्तविक पाहता मुलांचे हक्क, शिक्षण आणि कल्याण याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात बालदिन साजरा केला जातो. दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो, ज्यांना मुलांचे प्रेम होते. या दिवशी संपूर्ण भारतभर मुलांसाठी अनेक शैक्षणिक आणि प्रेरक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.