मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील उमरी मेघे येथील बुथवर जाऊन कार्यकर्त्यांसोबत वार्तालाप केल्यानंतर त्यांनी सांगितले की दुसऱ्या बुथवर ग्रामपंचायतिचा शिपाई बसून आहेत, असे सांगितले नंतर मी बुथवर जाण्यासाठी निघालो असता, मला मारहाण करण्यात आली. माझ्या पत्नीला मारहाण केल्यानंतर तक्रार नोंदवली असता, ती तक्रार मागे घेण्यासाठी पोलिस विभागाने दबाव आणला होता. माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यास डॉ. पंकज भोयरसह त्यांचे सहकारी जबाबदार राहणार असा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत नितेश कराळे यांनी केला आहेत.
आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, किसान अभियानचे अविनाश काकडे,सुधीर पांगुळ यांचेसह महाविकस आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. मांडवा येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यानंतर परत येत असताना, वाटेतील उमरी मेघे येथे बूथवर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना कराळे भेटले, आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की दुसऱ्या बुथवर ग्रामपंचायतीचे शिपाई व इतर चार सहकारी बसलेले आहेत, तर दुसऱ्या बुथवर जाण्यासाठी कराळे निघाले असता सचिन खोसे, अजय ठाकूर व ज्योती पद्माकर जायदे या तिघांनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली. तक्रार दाखल करण्याकरिता सावंगी पोलीस ठाण्यात ३ वाजता गेले असता, तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांनी सात लावले आणि त्यानंतर रात्री दीड वाजता तक्रार नोंदवली.
नितेश कराळे यांच्या पत्नीला व दीड वर्षाच्या मुलीला मारहाण केली असल्याने तक्रार नोंदवली असता पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला. दिलेल्या तक्रारीमध्ये विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांचे नाव नमूद केले असता ते नाव सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी काढण्यासाठी दबाव आणला होता. आरोपी असल्यासारखी वागणूक देण्यात आली होती. गुंड प्रवृतीच्या तिघांना चांगल्या प्रकारे वागणूक दिल्या गेली होती. कराळे यांनी मारहाण केली अशी तक्रार नोंदवली आणि कराळे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यास विद्यमान आमदार डॉ पंकज भोयर व त्यांचे समर्थक सचिन खोसे, अजय ठाकूर व ज्योती पद्माकर जायदे जबाबदार राहणार असा आरोप पत्रकार परिषदेत नितेश कराळे यांनी केला आहेत. घटना घडल्या नंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी संपर्क साधला असे नितेश कराळे यांनी सांगितले. न्यायालयात दाद मागितली जाणार आणि आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार.