मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झालेले असताना देखील महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर दावा करत होते. मात्र काल पत्रकार परिषद घेत त्यांनी मोदी-शाहांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची भूमिका काय असणार?, असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला.
मुख्यमंत्री कोण हे अजून ठरत नाही. 200 पेक्षा जास्त जागा येऊन पण मुख्यमंत्री ठरत नाही भाजपला पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्री पद का लटकून पडलं आहे हे जनतेला समजत नाही. आम्ही आजही मानत नाही की हा जनतेचा कौल आहे. राज्यात नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा कसा असू शकतो हेच समजत नाही. शिवसेना स्वतःला समजणाऱ्यानी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकर नाहीत. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की राज्य कोणाच्या हाती द्यायचं, असं संजय राऊत म्हणालेत. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. त्यामुळं जो होईल त्याच स्वागत करावं लागेल. पण तो कोण होईल हे दिल्ली ठरवेल.
तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटातील काही शिवसैनिकांनी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. याबाबत संजय राऊतांना विचारण्यात आलं. महाविकास आघाडी अजिबात फुटणार नाही. आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. काही कार्यकर्त्यांची वेगळ लढवी अशी भूमिका असते. लोकसभेला एकत्र लढलो त्याचा फायदा झाला, विधानसभेला का फायदा झालं नाही हे एकत्र बसून ठरवू. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. हे जिंकले त्यांची ही भूमिका नाही. जे पराभूत झाले आहेत त्यांना अस वाटणं चूक नाही. भविष्यात काय होईल ते बघू, असं राऊत म्हणालेत.