ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप म्हणजे ‘गरज सरो वैद्य मरो’.. बच्चू कडूंचा घणाघात

अमरावती वृत्तसंस्था 

 

बच्चू कडू यांचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपवर मोठा प्रहार केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेसाठी फोन केला होता. मात्र माझ्या मतदारसंघासाठी काही मदत हवी आहे का? काही निधी हवा आहे का? यासाठी कधीही त्यांनी फोन केला नाही. किंबहुना मित्रता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मला फोन केला नाही. त्यामुळे गरज सरो आणि वैद मरो ! ही भाजपची नेहमीची भूमिका आहे.

जाती-धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा परिणाम झाला. त्यामुळे माझा पराभव हा तांत्रिक पराभव आहे. ईव्हीएम मशीनचा ही त्यात सहभाग आहे. माझी ही गफलत झाली. मात्र मी पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता वाढेल. मला पराभूत झाल्यावर ही आनंद आहे कारण मी दिव्यांगांसाठी काम करतोय. अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू  यांनी ही आपल्या पराभवाचे कारण सांगत ईव्हीएम मशीनला जबाबदार ठरवले आहे.

राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत. त्यात दिव्यांग, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात पैसा आणि जात माझ्या विजयाच्या वाटेत आली. विरोधकांनी बच्चू कडूला टार्गेट करून अभियान राबवविलं. तसेच भारतीय जनता पार्टी म्हणजे “गरज सरो वैद्य मरो” मलाही याचा अनुभव आलेला आहे. त्यांच्या मदतीसाठी फडणवीस यांचा फोन येतो, मात्र त्यानंतर ते बच्चू कडूंना विसरले.

तसेच घटत्या लोकसंख्या वाढीच्या दरावरुन सरसंघचालकांनी मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी म्हटलं आहे. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांनी यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावरून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संघ प्रमुख मोहन भागवत यांनी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे, असा सल्ला दिला आहे. भाजपच्या आमदार खासदारांनी आधी हे केलं पाहिजे. एकीकडे तीन अपत्य असेल तर निवडणूक लढवता येत नाही. महत्त्वाचं राष्ट्रहित आहे. राष्ट्र आहे तर धर्म आहे. असेही बच्चू कडू म्हणाले.

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेबाबतही बच्चू कडू यांनी भाष्य केलंय. गृह मंत्रालय या साठी महत्त्वाचं आहे की कुणाला ठेचायच, कुणाच्या नाग्या नडवायच्या ते या गृह मंत्रालयकडून केल्या जातात. सत्तेतला दांडुक म्हणजे हे मंत्रालय. गावात कितीही खून होऊ द्या, त्याच्याशी पार्टीला काही घेणे देणे नसतं. असंख्य खूनातून पार्टी कशी निर्माण करता येईल, हा भाव त्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून असतो.  लाडकी बहीण योजना आणून वेळेवर तिजोरी खाली केली आणि नंतर फोन केल्या गेले की तुमच्या खात्यात सात हजार रुपये आले, हे काय? त्यामुळे जिसकी सत्त्ता उसकी भैंस. असेही बच्चू कडू म्हणाले. तर मुख्यमंत्री कुणीही होवो, जो जनतेची काम करेल तो आवडेल. असेही ते म्हणाले. माध्यमांनी खोटी माहिती जाहीर केली की मी शिंदेंना भेटलो. मात्र माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही. ते माझे मित्र जरूर आहेत. मात्र आमची भेट झालेली नाही. अशी माहिती  बच्चू कडूंनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!