ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अक्कलकोटमध्ये जल्लोष

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

 

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अक्कलकोट शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने अक्कलकोट शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे,अजित पवार यांनी महायुतीतर्फे शपथविधी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचा विजय असो, देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आमदार सचिन कल्याणशेट्टी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, वंदे मातरम अशा विविध घोषणा देत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. याबरोबरच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अक्कलकोट मैंदर्गी, दुधनी, जेऊर, तडवळ, नागणसूर, तोळणुर, सलगर, वागदरी, चपळगाव, हन्नूर, दहिटणे, वळसंग, कुंभारी, बोरामणी, मुस्ती, तांदुळवाडी आधी भागात भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

याप्रसंगी शिवशंकर वाले, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, रमेश कापसे, अंबण्णा चौगुले, शिवशंकर चनशेट्टी, बबलु  कामनुरकर, आनंद खजूरगिकर सर ,आनंद पवार , विनोद मदने, नावेद डांगे, सिद्दू चौगुले, सुनिल गवंडी, वैजनाथ मुकडे, उदय नरेगल, स्वप्नील फुकाळे, अभि लोकापुरे, चंद्रकांत दसले, शरणु कापसे , अतिष पवार, देविदास गवंडी, सिध्दाराम माळी, बबलु भागानगरे, हुसेन बागवान, रवि साठे, नितिन जामदार, अमित कोळी, विजय लाडगे, भारत भाडेकर, नुर शेख, शेखर वाले, निशात निबाळकर, राजू कोतवाल, सचिन शिदे , बसवराज स्वामी, शिवराज तडवळ,सिध्दु माशेट्टी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

महायुतीचे सरकार आल्याने आनंद

राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याने आनंद झालेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल. विशेषतः सोलापूर जिल्हा आणि अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी विकास निधी मोठा मिळेल यात शंका नाही. फडणवीस यांच्या निवडीने तळागाळातल्या सामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा समाधानाचे वातावरण आहे.

सचिन कल्याणशेट्टी, आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!