---Advertisement---

शपथ घेताच फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर

By team
On: December 5, 2024 8:20 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था 

आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज मंत्रालयात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर  देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी नव्या सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. गेले अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तर आता फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर बोलताना ते म्हणाले की जरी आमची पदं बदलले असले तरी कामाची दिशा बदलणार नाही, कामाची दिशा कायम राहणार आहे.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी नव्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. जरी आमची पदं बदलले असले तरी कामाची दिशा बदलणार नाही, कामाची दिशा कायम राहणार आहे, आता कसोटी सामना आहे, असा सूचक इशारा फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अधिकाऱ्यांना दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नवं सरकार हे धोरात्मक निर्णय घेणार आहे. नवं सरकार अधिक जोमानं आणि गतीनं काम करणार आहे. आमच्या कामाची दिशा बदणार नाही. दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही तातडीनं पाऊलं उचलणार आहोत. मी जनतेला विश्वास देतो की हे सरकार पूर्णपणे पारदर्शी कारभार  करेल. येत्या सात, आठ आणि नऊ तारखेला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. याच अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड करू, 9 तारखेला राज्यपालांना अध्यक्षांच्या निवडीसाठी पत्र देऊ. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा देखील पूर्ण झाली आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!