नवी दिल्ली: नव्या वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्राचे ट्रॅक्टर्स महागणार आहेत. या ट्रॅक्टर्सची किंमत किती महागणार आहे, याची माहिती कंपनीने दिलेली नाही. मात्र, नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहोचणार हे नक्की.
इनपूट कॉस्टच्या प्रभावाला ऑफसेट करण्यासाठी ट्रॅक्टरच्या किंमतीत वाढ
महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने पुढच्या महिन्यापासून ट्रॅक्टरची किंमत वाढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इनपूट कॉस्टच्या प्रभावाला ऑफसेट करण्यासाठी ट्रॅक्टरच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2021पासून महिंद्राच्या सर्व ट्रॅक्टर्सच्या किंमती वाढणार आहेत. कमोडिटी किंमतीतील वाढ आणि इतर इनपूट कॉस्ट वाढल्याने ट्रॅक्टर्सच्या किंमती वाढवण्याची गरज निर्माण झाली होती. येत्या काही दिवसात वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमतींची माहिती दिली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात या कंपनीने पुढच्या महिन्यापासून पॅसेंजर आणि कमर्शियल व्हिकलच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. हे वाढलेले भाव सर्व मॉडल्सला लागू होणार असल्याचंही कंपनीने म्हटलं होतं.