---Advertisement---

युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद करा ; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

On: December 21, 2020 2:59 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई |  युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद ठेवली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात सूचवलं आहे.

 

दरम्यान, कोरोना हा चीनमधून जगभर पसरला आहे, भारतातही विदेशातूनच कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे, अतिदक्षता घेण्यासाठी आता युके ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. ”विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी  संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.”, असे ट्विट चव्हाण यांनी केलं आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे,  भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!