मुंबई, वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. याची भाजप परतफेड करणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 7) मुलाखतीवेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली. पण त्याआधीच निवडणुकीच्या निकालानंतर मनसेची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांकडून समीक्षा केली गेली. त्याचा रिपोर्ट सांगितला गेला. त्यामध्ये सर्व नेत्यांचे म्हणणे राज ठाकरे यांनी जाणून घेतलं. आता आपण पुढची रणनीती कशी असेल याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभेमध्ये एकला चलो रे ची भूमिका होती तर लोकसभेला भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण, आता पुढे काय त्या बैठकीत सर्वच नेत्यांचं आता पुढचा कोणताही विचार न करता हिंदुत्वाच्या विचारधारेच्या लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे याबाबतच एकमत झाल्याची चर्चा होती.
आपण भाजपासोबत राहायला पाहिजे, भाजपाला आपण मदत केली आहे. महायुतीला लोकसभेत मदत केली आहे. निकाल आत्ता आपल्या बाजूने आला नाहीये. पण त्यांच्यासोबत राहून आपला पुढचा प्रवास केला पाहिजे असं मत बैठकीमध्ये आलेल्या नेत्यांचं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे हे स्पष्ट केल्यानंतर, दोघांच्या विचारधारा एकच आहेत त्यात विचारधारेचे पक्ष एकत्र आले तर, आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो. देवेंद्र फडणवीस यांचा वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वजण सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत. राज ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे, जर या दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाली तर ते सोबत पुढे जातील अशी शक्यता अनेक जण वर्तवत आहेत.
लोकसभेत मनसेनं महायुतीला आणि भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंबा दिला, त्याचं रिटर्न गिफ्ट देखील यावेळी मनसेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानपरिषद किंवा महामंडळ किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं एखाद पद मनसेला देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची चर्चा सुरू आहे. अद्याप देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली नाही. भेट झाल्यानंतर सर्व माहिती समोर येईल. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री काही दिवसांपासून नव्हे तर काही वर्षांपासून आहे. मागच्या काही निवडणुकीमध्ये पाहिलं तर फडणवीस यांनी भेटी-गाठी घेतल्यानंतर, चर्चा केल्यानंतर आणि सांगितल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका महायुतीच्या बाजूने किंवा भाजपच्या बाजूने केलेली होती. दोघांची मैत्री चांगली आहे आता या दोन पक्षांमध्ये मैत्री होते, का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पण ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आणि विचार करून तसंच मनसे देखील याबाबत विचार करून आपली भूमिका लवकरच मांडण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या आधी दोन्ही नेत्यांमध्ये भेटीगाठी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे.