अक्कलकोट, वृत्तसंस्था
दै. नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल यंदाचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदरचा पुरस्कार हा बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. मुंबईतील कफप्रेड येथील ताज प्रेसिडेंट येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.