अक्कलकोट, वृत्तसंस्था
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती सोहळा शनिवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री दत्त मंदिरात मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी नंतर श्रींच्या जयंतीनिमित्त गुलाल व पाळणा कार्यक्रम हिरकणी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अलकाताई जन्मेजयराजे भोसले, सौ.अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लक्षवेधी चांदीच्या पाळण्याला व श्री दत्त मंदिराला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते. पाळणा कार्यक्रमाच्या दरम्यान विविध भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित भक्तांना प्रसाद वाटण्यात आले.
याप्रसंगी हिरकणी संस्थेच्या सौ. अनुसय्या फुगे, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु.स्वामिनिराजे अमोलराजे भोसले, कु.समर्थ फुगे, सोनाली फुगे, लता मोरे, धनश्री पाटील, स्मिता कदम, पल्लवी कदम, सुवर्णा घाटगे, उज्वला भिसले, छाया पवार, कविता भोसले, सिमा फुटाणे, कल्पना मोरे, सत्यभामा मोरे, राजश्री माने, कोमल क्षिरसागर, शितल क्षिरसागर, स्वप्ना ग्राम व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, मनोज निकम, प्रा.शिवशरण अचलेर, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, विजय माने, राहुल इंडे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.