मुंबई वृत्तसंस्था
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-यासाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेत येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया पाहता यामध्ये कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयोगाच्या या निर्णयामुळं महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारां याचा थेट फायदा मिळणार असून त्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी ६ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी ७ जानेवारीची मुदतअसणार आहे तर चलनाद्वारे ९ जानेवारीपर्यंत परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती देणारी एक्स सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली ाहे.. या निणर्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्या कारणाने नोकरीपासून वंचित लाखो उमेदवार आणि इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.
कुणाला मिळणार लाभ ?
सरकारी सेवांमध्ये थेट भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत उच्च वयोमर्यादेत एक वर्षाची सूट देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2024 पासून सदर शासन निर्णयाच्या तारखेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदांच्या भरतीसाठी नव्याने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवर अर्ज करणारे सर्व उमेदवार आणि ज्यांच्यासाठी निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पूर्ण झालेला नाही, त्यांची कमाल वयोमर्यादा एक मर्यादेत वर्षभराची सूट देण्यात आली आहे.