सोलापूर : प्रतिनिधी
सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश कदम यांची निवड झाली आहे. सातारा येथे दिनांक 28 व 29 डिसेंबर रोजी पार पडलेल्या संघटनेच्या मेळाव्यात ही निवड झाली. देशमुख हे 2017 साली महाराष्ट्र शासनाचे सह सचिव म्हणून 30 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले व सध्या पुणे टाटा मेट्रो मध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
संघटनेच्या इतर सदस्यांची सुद्धा यावेळी निवड झाली. ते पुढील प्रमाणे: रवींद्र देशमुख (उपाध्यक्ष), महेश खिलारे (सचिव), लेफ्टनंट कर्नल जयंत मुळगिर (सहसचिव), दिग्विजय नलावडे (खजिनदार), निवृत्त विंग कमांडर गणेश येवले (सह खजिनदार). भारतात अशा प्रकारच्या असलेल्या 33 शाळापैकी सुरू होणारी पहिली असलेल्या सैनिक स्कूल सातारा ची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने झाली. तिचे उद्घाटन तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी 23 जून 1961 रोजी केले.
शाळेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवशी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्या पासून ते गत वर्षी शाळेबाहेर पडलेल्या माजी कॅडेट्स पर्यंत शेकडो माजी विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित होते, अशी माहिती सैनिक शाळा माजी विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते विलास तोकले यांनी दिली. “सर्जिकल स्ट्राईक” फेम लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे हे माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. संघटनेच्या सल्लागार समितीचे सदस्य सुरेश जाधव, अमर जाधव, मदन पवार, राजेंद्र सूर्यवंशी, प्रदीप मोहिते व नितीन कणसे यांनी यावेळी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.