अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथील समर्थ बसवराज लोंढे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उज्वल यश संपादन करून गावाचा नावलौकिक वाढविला आहे.एका जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या मुलाने उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळविणे गावातही कौतुकाचा विषय बनला आहे.
वडील बसवराज लोंढे हे तसे १९८२ मध्ये कुस्ती प्रकारामध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त केले होते.त्यामुळे तालुक्याला आजही ते क्रीडा मार्गदर्शक म्हणून परिचित आहेत. त्यांनी वेळोवेळी समर्थ यांना मार्गदर्शन केले आहे. यानंतर समर्थ यांनी शिक्षण घेत घेत राजस्थान, बेंगलोर,पुणे ,जयपुर, कानपूर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत उज्वल यश संपादन केले होते.त्यावेळी त्याची केनिया येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
समर्थ हा एक राष्ट्रीय खेळाडू असून महाराष्ट्र संघाकडून यापूर्वी त्यांनी सात वेळा राष्ट्रीय खेळात सहभाग नोंदविला आहे. यात बिहारमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.ग्रामीण भागातून लोंढे यांनी यश मिळाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.विशेष म्हणजे समर्थ यांचे सातवीपर्यंत शिक्षण मिरजगी जिल्हा परिषद शाळेत झाले असून इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शहाजी प्रशाला अक्कलकोट येथे झाले आहे. बीएपर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा येथे झाले आहे.
सध्या तो नाशिक येथे पोलीस खात्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे यश मिळाले असून जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी देखील अशाप्रकारे यश मिळवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखविल्याने सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे. समर्थला पोलीस खात्यात जायची खूप इच्छा होती.त्याच्या मोठ्या भावाने बाळासाहेबने देखील याच परीक्षेतुन पोलीस उपनिरीक्षक झाले.त्याची प्रेरणा घेत यांनी देखील संपादन केले.त्याच्या आईचे देखील त्याला यात चांगले मार्गदर्शन मिळाले,असे त्याचे वडील बसवराज लोंढे यांनी सांगितले.