ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वागदरी मतदारसंघातील बिनविरोध गावांसाठी तानवडे यांचा विकास निधी जाहीर

 

अक्कलकोट, दि.२३ : वागदरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य
आनंद तानवडे यांनी आता त्यांच्या मतदारसंघातील गावाची निवडणूक बिनविरोध झाल्यास ५ आणि १० लाखाचा विकास निधी जाहीर केला आहे.

कोरोनाची महामारी आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव व नागरिक सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यातच अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. या निवडणूक काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये तसेच निवडणूक खर्चात बचत व्हावी यासाठी आपल्याला वागदरी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या बिनविरोध करायचे आहेत त्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.वागदरी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावाला प्रत्येकी ५ लाखाचा विकास निधी तसेच पाच हजारच्या पुढील लोकसंख्या असलेल्या गावात १० लाख रुपयांचा निधी आपण विकास कामासाठी देऊ,असे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. हा टप्पा सगळ्यात मोठा आहे आणि या टप्प्यात वागदरी मतदारसंघातील बहुतांश गावे येतात. त्यामुळे आपली चर्चा सर्वांशी सुरू आहे त्यांना यासाठी मदत करण्यात येईल,
असे देखील ते यावेळी
म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!