दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी
संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांच्या दक्षिण तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान तहसिल कार्यालयाकडून त्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे
जमा करणेत येत आहे.शासनाकडील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील पत्र क्रं. विसयो-२०२४/प्र.क्र.२४/विसयो दि.१८/१२/२०२४ अन्वये संजय गांधी योजना/श्रावणबाळ योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना फेब्रुवारी २०२५ पासूनचे अर्थसहाय्य केवळ DBT पोर्टलवर On Board Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांनाचा करण्यात येणार आहे. On Board Aadhar Validate नसलेल्या तसेच DBT पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य फेब्रुवारी २०२५ पासून बंद करण्याचे आदेश आहेत.शासनाचे नवीन धोरणानुसार DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यांवर अनुदान वितरीत करण्याचे असलेने लाभार्थ्यांच्या खात्यांवार थेट राज्याशासनामार्फत अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
या करिता सदर योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ त्यांचे आधार कार्डला संलग्न असलेल्या मोबाईलसह आपल्या नजीकच्या महा-ई-सेवा केंद्र/आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन आधार व्हेरीफीकेशन (आधार कार्ड अपडेट करणे, जन्म दिनांकांची संपूर्ण माहिती दिनांक/महिना/वर्ष या नमून्यात मोबाईल लिंक करणे इत्यादी) करुन घेणे. तसेच आपले बँक पासबूक हे ekyc/ckyc करून घेणे बंधनकारक आहे.त्यानूसार जे लाभार्थी आधार व्हेरीफीकेशन करून आपले आधारकार्ड बँक पासबूकला संलग्न करुन घेणार नाहीत त्यांचे अनुदान फेब्रुवारी २०२५ पासून बंद करण्यात येईल त्यामूळे सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आधारकार्ड बँक पासबूकला संलग्न करावेत,असे आवाहन श्री. किरण जमदाडे, तहसिलदार दक्षिण सोलापूर यांनी केले आहे.