ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सोसायटीच्या उपाध्यक्षपदी विद्या पाटील

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे या पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील विद्या पाटील यांची निवड करण्यात आली.माजी
शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था सुरू आहे.

यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची एक मताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. ए.ए. गावडे यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पडल्यानंतर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते नूतन व्हाईस चेअरमन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सुरेश गुंड, सुप्रिया पांगळ, समाधान घाडगे, शिवाजी शिंदे, दत्तात्रय कदम, तात्यासाहेब काटकर, मारुती गायकवाड, संभाजी चव्हाण, शिवाजी थिटे, कैलास देशमुख, सुभाष भिमणवरु, नवनाथ मोहोळकर, जवानसिंग रजपूत, नामदेव आलदर, शंकर वडणे, सचिव चंद्रकांत भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा समन्वयक परमेश्वर व्हसुरे, दयानंद उटगे, श्रीशैल म्हमाणे ,रामलिंग मंजुळकर ,वाहिद पटेल, मुस्ताक शेख, पंडित मोरे,तालुका कृती समितीची पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!