अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यात सुरु
असलेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी तब्बल १ हजार १९२ अर्ज प्राप्त झाले.
तालुक्यातील नागनहळळी,उडगी,हंजगी
या तीन ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर असल्याचे समजते.हंजगी ग्रामपंचायतीचा तर दोन दिवसांपूर्वी तसा निर्णय झाला होता.इतर ठिकाणी अद्याप असे प्रयत्न
सुरू आहेत.इतर ठिकाणचे चित्र
मात्र ४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने तहसील परिसरात तोबा गर्दी झाली होती. मागच्या दोन दिवसात अर्जांची संख्या प्रचंड वाढली त्यामुळे प्रशासनावर देखील काही अंशी ताण पाहायला मिळाला.
आत्तापर्यंत एकूण अर्जांची १ हजार ८८३
झाली आहे.आज सकाळी ११ वाजल्यापासून या अर्जांची छाननी होणार आहे.तालुक्यात एकूण २३५ प्रभागांसाठी ६३४ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.त्यामध्ये अद्याप उमेदवार माघार घेण्याची प्रक्रिया आणि उमेदवारी अर्जांची छाननी होणे बाकी आहे.काही गावांमध्ये बिनविरोध हालचाली जोरदार सुरू आहेत परंतु अद्याप तरी याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
उमेदवार माघार घेण्याच्या दिवशीच अंतिम
चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वर डाऊन असल्यामुळे अनेकांनी ऑफलाइन पद्धतीने आज अर्ज भरला. मागच्या तीन दिवसात ऑनलाईनसाठी मोठी गर्दी झाली होती. आता सर्वांचे लक्ष छाननीकडे लागले
आहे.