ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीमधून ५८ अर्ज अवैध; कामकाजात एकसूत्रीपणा नसल्याने गोंधळ

 

अक्कलकोट दि.३१: अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व अर्जांची गुरुवारी छाननी झाली.त्यामध्ये विविध कारणाने ५८ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याची माहिती प्रशासनाने
दिली.दरम्यान प्रशासनात दिवसभर कामकाजात एकसूत्रीपणा नसल्याने गोंधळ उडत आहे.याबद्दल नाराजी
व्यक्त करण्यात आली.आज सर्वच ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची छाननी असल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच अक्कलकोटमध्ये निवडणूक लागलेल्या गावातील प्रतिष्ठित नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांची फौज जमली होती.जस
जसे उमेदवार वैध होत गेले तसे वैध उमेदवार गावाकडे रवाना झाले. एकूण ७२ ग्रामपंचायतीच्या २३५ प्रभागातून ६३४ सदस्य जागा निवडुन द्यावयाचे आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १ हजार ८७९ उमेदवारानी १ हजार ८८३ अर्ज दाखल केले होते. त्या सर्व अर्जाची छाननी झाली. त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, जातपडताळणी पोच, चुकीच्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करणे, इतर कागदोपत्राची पूर्तता नसणे आदी कारणाने ४२ उमेदवाराचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले.दरम्यान
तालुक्यात ६० ते ७० टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागलेल्या असताना आशा वेळी प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून पदभार देणे अयोग्य असल्याची तक्रार अनेकांनी यावेळी केली.यामुळे वेळेवर माहिती संकलन होण्यास व अनुभव अभावी कागदोपतत्राची वेळेवर तपासणी होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.पत्रकारांना माहिती देण्यास विलंब होत आहे.याबद्दल पत्रकारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.आता पर्यंत निवडणूकित कुठलीच प्रक्रिया वेळेवर
पार पडली नाही,त्यामुळे तहसीलदार कार्यालयात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होती. तात्काळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावर मार्ग काढावा अन्यथा मतदानापासून मतमोजणीपर्यंत गडबड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे मत नागरिकांतुन व्यक्त
होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!