मेष
श्रीगणेश म्हणतात की, आज मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा निघेल. तरुणांनी त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करावे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. व्यावसायिक कामे पूर्वीसारखीच सुरू राहतील. कुटुंबासमोवत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृषभ
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमची आर्थिक स्थिती आणि घराची व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. बेकायदेशीर कृत्या सहभागी होणार्यांपासून लांब राहा. जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या अडचणीचे कारण ठरण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या कार्यपद्धतीत काही बदल होऊ शकतात. दैनंदिन दिनचर्येसह आहाराकडे लक्ष द्या.
मिथुन
श्रीगणेश म्हणतात की, बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे आज एखाद्याच्या मदतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास टाळणे हितकारक ठरेल. कर्मचाऱ्यांच्या मदतीने व्यवसायात रखडलेली कामे पुन्हा सुरू करता येतील. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल.
कर्क
श्रीगणेश सांगतात की, आज काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सकारात्मकता आणि संतुलित विचारसरणीमुळे कामे नियोजनबद्ध पद्धतीने होतील. चर्चेपेक्षा कृतीवर भर देणे आवश्यक. व्यावसायिक कामे सामान्य राहतील. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंता राहिल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह
श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहमान तुमच्यासघठी अनुकूल आहे. समाज आणि कुटुंबात तुमच्या विशेष कार्याची प्रशंसा होईल. सर्वांशी सुसंवाद राखून यश मिळेल. अति भावनिकता हानिकारक ठरू शकते, याची जाणीव ठेवा.
कन्या
आर्थिक बाबींशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सकारात्मक परिणाम देऊ शकतात. नातेवाईकाच्या आरोग्यात सुधारणा झाल्याने मनशांती लाभेल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करा. तुमच्या योजनांवर चर्चा करु नका. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ
श्रीगणेश सांगतात की, सध्याची परिस्थिती समजून भविष्यातील योजनांवर चर्चा करा. कुटुंबात सुरू असलेली गोंधळ दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम बनवाल. दुपारनंतर परिस्थिती थोडी अधिक अनुकूल होऊ शकते. विचारपूर्वक खर्च करा. व्यावसायिक कामकाज सामान्य राहील.
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की, आज तुमचा दिवस व्यस्त असेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. तणावामुळे होणारी चिडचिड तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकते. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा विचार करणे आवश्यक आहे.
धनु
श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे कोणतेही अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकते. दुपारनंतर ग्रहमान अनुकूल असेल. जवळची व्यक्ती तुमच्या समस्येचे कारण असू शकते. भावनिकतेपेक्षा व्यावहारिक राहण्याचा हा काळ आहे. व्यवसायात फायदेशीर कामे सुरू होतील. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
मकर
श्रीगणेश सांगतात की, आज मालमत्ता खरेदी किंवा विचाराशी संबंधित कोणताही व्यवहार अंतिम होऊ शकतो. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ नका. मुले काळजी करू शकतात. व्यवसाय क्षेत्रातील स्पर्धकासोबत वादासारखी परिस्थिती उद्भवू शकते.
कुंभ
श्रीगणेश म्हणतात की, दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक विचारांनी केली तर दिवस चांगला जाऊ शकतो. आज अचानक होणारी कोणतीही फायद्याची योजना कुटुंबाशी चर्चा करूनही करता येते. काही काळापासून सुरू असलेल्या कोणत्याही चिंता देखील दूर होऊ शकतात. तुम्ही तुमच्या क्षमता आणि कठोर परिश्रमाने तुमची आर्थिक स्थिती राखाल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन
कंटाळवाण्या दिनचर्येतून मुक्त होण्यासाठी तुमच्या आवडीच्या कामांमध्ये वेळ व्यतित कराल. तुमच्या प्रतिभेला चालना मिळाल्याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल. घरातील किरकोळ गोष्टींना जास्त महत्त्व देवू नका. तुमची दैनंदिन दिनचर्या तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकते.