मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसपासून अनेक वादात अडकत असल्याचे दिसून येत आहे नुकतेच पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री मुंडे यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अंजली दमानिया म्हणाले कि, धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत या हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही. मी सुरुवातीला कराड आणि मुंडे यांचा कसा संबंध आहे हे मी दाखवले. कराड आणि धनंजय मुंडे हे कंपन्यांमध्ये एकत्र कसे आहेत ते मी दाखवले, त्यांचे आर्थिक व्यवहार असो, मिळालेला नफा असो, दहशत असो मग ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मी दाखवले राज्याच्या मंत्र्याला राज्याच्या कंपनीकडून थेट नफा मिळत आहे. बॅलन्स शिटच्या बॅलन्स शिट भरले जात आहेत. त्यानंतर मी कृषी घोटाळा बाहेर काढला, असे देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, कृषी घोटाळ्यात मी दाखवले की 80-90 रुपयांचे नॅनो युरियाला 220 रुपयांनी खरेदी केली गेली. या सगळ्या गोष्टींचे डीटेल्स दिले. त्यानंतर मी या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल मागवल्या देखील आणि त्याचा इनव्हॉईस मी ट्विट केला. तर त्याचा जर आपण क्रम पहिला तर 4 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि 5 तारखेला मी या बॉटल मागवल्या आणि त्यानंतर 7 तारखेला कंपनीकडून बंदी घालण्यात आली आणि असे सांगण्यात आले आहे की कुठल्याही ऑनलाईन कंपन्या इफकोचे प्रॉडक्ट विकू शकत नाही. धनंजय मुंडे यांचे पीए जोशी म्हणून आहेत कोणीतरी त्यांनी सगळ्या माध्यमांना पाठवून दिले की इफकोचे प्रॉडक्ट विकता येत नाही असे जाहीर केले. मात्र अनेक वेबसाइटवरून प्रॉडक्ट विकले जातात.